कन्हान ला जनता कर्फ्यु लावण्याची मागणी

कन्हान शहर विकास मंच व्दारे नगरा ध्यक्षा, मुख्याधिकारी व पोलीस प्रशासना स मास्क देत निवेदन.

कन्हान ता.प्र.दी.१९: – शहरात व परिसरात कोरोना रुग्णांची दिवसेगणित संख्या वाढत असु न रुग्णांची मुत्यु संख्या वाढुन तीन युव काचा मुत्यु ने नागरिकांत भीतीचे वाता वरण निर्माण झाल्याने कोरोना रुग्णाची वाढती संख्येची साखळी रोखण्याकरिता कन्हात शहरात आठ दिवसाचा जनता कर्फ्यु लावण्याची मांगणी कन्हान शहर विकास मंच व्दारे निवेदनाने करण्यात आली.
कन्हान शहर व परिसरात कोरोना रुग्णांची व मृत्युची संख्या वाढत असुन ही नगरपरिषद प्रशासन द्वारे कुठल्याही प्रकारची सेनिटाइझर फवारणी होत ना ही. शहरातील बाजारात सोशल डिस्टे सिंग व मास्कता वापर होत नसल्याचे दिसुन येत आहे. कन्हान शहर हे आजु-बाजुच्या ग्रामीण भागातुन शेतकरी व नागरिक खरेदी विक्री करण्याकरिता येत असतात. व्यापारी, भाजीपाला दुकानदा र व नागरिक नियमाचे पालन करित नस ल्यामुळे शहरात कोरोना विषाणुचा प्रादु र्भाव वाढण्याची शक्यता नकारता येत नाही. करिता दंडात्मक कारवाई शहरात होणे गरजेचे झाले आहे. कन्हान शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या ६२३ झाली असुन मृत्युची संख्या १८ झाली. यात कन्हान २ व कांद्री १ युवकाचा मुत्यु चिंतेचा विषयाने शहरात भितीचे वाताव रण झाल्याने वाढता प्रादुर्भाव रोखण्या स रूग्ण संख्येची साखळी तोडण्या करि ता कन्हान आठ दिवसाचा जनता कर्फ्यु लाव्ण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांचा नेतृत्वात नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर,मुख्या धिकारी गिरीश बन्नोरे, कन्हन पोलीस स्टेशनचे एपीआई अमित कुमार आत्राम यांना मास्क देत करण्यात आली. याप्रसं गी शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे , उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदी प बावने, महासचिव संजय रंगारी, निति न मेश्राम, हरीओम प्रकाश नारायण, प्रवि ण माने, शाहरुख खान आदी उपस्थित होते.

सत्य शोधक संघ कन्हान व्दारे जनता कर्फ्यु ची मागणी

कन्हान : – शहरात व परिसरात कोरोना महामारीची भयानक परिसस्थिती पाह ता सामाजिक बांधिलकी जपत कोरोना रूग्णाची वाढती संख्या व मुत्युचे प्रमाण रोखण्याकरिता कोरोना रूग्ण संख्येची साखळी तोडण्याकरिता कन्हान शहर व परिसरात स्वयंफुर्त जनता कर्फ्यु लाव ण्याची मागणी सत्य शोधक संघ कन्हान व्दारे नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, मुख्याधिकारी व उप पोलीस निरिक्षक अमित कुमार आत्राम हयाना निवेदन देऊन करण्यात आली. याप्रसंगी प्रशांत वाघमारे, महेंद्र भुरे, सतिश भसारकर, शक्ती पात्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *