कन्हान पोलीस स्टेशन ला महा विकास आघाडी कन्हानचे निवेदन.
कन्हान ता.प्र.दी.१४: – चित्रपट अभिनेत्री कंगना रा णावत व्दारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एकरी व अपमानास्पद शब्दाचा प्रयोग केल्याबद्दल महाविकास आघाडी कन्हान च्या वतीने पोलीस स्टेशनचे पोलीस निरी क्षक निवेदन देऊन कंगना राणावत विरू ध्द गुन्हा दाखल करण्याची मांगणी करण्यात आली.
चित्रपट सुष्टीत काम करणारी एक महिला कलावंत महिला व्दारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना एकरी शब्दात व अपमानास्पद शब्दाचा प्रयोग करून अप मान करित असेल तर येथील नागरिक कदापीही सहन करणार नाही. हे अपरा धीक कृत्य असल्याने कंगणा राणावत या महिला विरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी कन्हान पोलीस निरिक्षक हयाना शिवसे ना कार्यकर्ता लोकेश बावनकर, कॉग्रेसचे सतीश भसारकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे रोहित मानवटकर, स्वप्नील मते, शरद वाटकर, प्रविण गोडे, शिवशंकर वाकुड कर, समीर मेश्राम, शक्ती पात्रे, नितीन मेश्राम, अभिजित चांदुरकर, रॉबिन निकोसे, प्रविण मंदुकर, दीपक कुभंलक र, दिनेश काका, हरिओम यादव, बादल साहारे, आकाश मेश्राम, आकाश पाटील आदी महाविकास आघाडी कार्यकत्यांनी उपस्थित होऊन केली आहे.