कन्हान७,कांद्री६,डुमरी३,आमडी२, टेकाडी,वलनी,पटगोवारी असे२१ मिळुन कन्हान परिसर ५५५.
कन्हान ता.प्र.दी.१४ : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन कांद्री वृध्द पुरूष व महिला दोन रूग्णाचा मुत्यु झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ८५ लोकांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत ७, स्वॅब ६, साटक केद्राचे ५ व खाजगी ३ असे २१ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ५५५ रूग्ण संख्या झाली आहे.
शनिवार दि.१२ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ५३४ रूग्ण असुन रविवा र (दि.१३) कांद्री च्या ७५ वर्षीय पुरूष व ७० वर्षीय महिला या दोन वृध्दाचा मुत्यु झाला आहे. सोमवार (दि.१४) ला प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधि र शाळा कांद्री ला रॅपेट ७४ व स्वॅब ११ असे एकुण ८५ लोकांच्या तपासणीत ७ , स्वॅब तपासणीचे ६ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या १३ लोकांच्या तपासणी त ५ रूग्ण, सावनेर तपासणीत कन्हान १, खाजगी २ असे २१ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान २५९,पिपरी ३२, कांद्री १००, टेकाडी कोख ५८,बोरडा १,मेंहदी ८, गोंडेगाव खदान १२, खंडाळा २, निलज ७, जुनि कामठी ९, गहुहिवरा १, बोरी १ असे कन्हान ४९० व साटक ५, केरडी १, आमडी ८, डुमरी ८, वराडा ६, वाघोली ४, नयाकुंड २, पटगोवारी १ असे साटक केंद्र ३५, नागपुर १५, येरखेडा ३ कामठी ६, वलनी २, तारसा १, सिगोरी १, लाप का १, करंभाड १ असे कन्हान परिसर एकुण ५५५ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ७, कांद्री ६, वराडा १, टेकाडी १, निलज १असे कन्हान परिसरात एकुण १६ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट
जुने एकुण -५३४
नवीन – २१
एकुण – ५५५
बरे झाले – ३३७
बाधित रूग्ण – १८४
मुत्यु – १६