मौदा ता प्रतिनिधी । मागील दिवसात मौदा तालुक्यातकन्हान नदीला आलेल्या महापूर मुळे तालुक्यतील अनेक गावाला त्याचा फटका बसला अनेक कुटुंब बेघर झाले शेती पिकाचे मोठे नुकसान झाले कोरोना संकट आणि त्यात आलेले महापूर चे संकट यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे या संकटातून सावरण्याचा दृष्टीने शासनाने पूरग्रस्तांना मदत करावी या आशयाचे निवेदन भाजप नेते आणि माजी सरपंच मोरेश्वर सोरते यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि पूरग्रस्त यांचे उपस्तीतीत मौदा तहसीलदार श्री प्रशांत सांगळे याना देण्यात।आले सर्व पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपये खावटी आणि घर दुरुस्तीसाठी प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपये तसेच मौदा येथे रिलायन्स कंपनीच्या खाली जागेवर पूरग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे या व इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने पूरग्रस्त कुटुंबातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्तीत होते शासनाने पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोरेश्वर सोरते यांनी दिली