कन्हान शहर विकास मंच व्दारे उप वि. पो. अधिकारी यांना निवेदन.
कन्हान ता.प्र.दी१२ :- मौदा येथील छत्रपती शिवा जी महाराजांच्या मुर्तीची अज्ञात समाज कंटकाने विटंबना केली असल्याने शिव प्रेमीसह नागरिकांच्या भावाना दुखाव ल्याने दोषी समाजकंटकास त्वरित अट क करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कन्हान शहर विकास मंच व्दारे कामठी उपविभागीय पोलीस अधि कारी हयाना निवेदन देऊन केली आहे.
मौदा येथील पावडदौना मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा उजावा हात तोडुन, चेहरा घासुन मुर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली असल्याने शिवप्रेमीसह नागरिकांच्या भा वाना दुखावल्याने दोषी समाजकंटकास त्वरित अटक करून कठोर कारवाई कर ण्यात यावी. अशी मागणी कन्हान शहर विकास मंच व्दारे या घटनेचा जाहिर नि षेध करुन कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुंजलवार यांना भेटुन निवेदन देऊन केली आहे. शिष्टमंडळात कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष प्रवि ण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचि व प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, नितिन मेश्राम, प्रविण माने, शाहरुख खान, कामेश्वर शर्मा, हरीओम प्रकाश नारायण, मुकेश गंगराज आदी पदाधि कारी उपस्थित होते.