तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्या

मनसे तालुकाध्यक्ष रोशन फुलझे ले ची निवेदनाने मागणी.

कन्हान ता.प्र.दी.७: – महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे मा. हेमंतभाऊ गडकरी प्रदेश सरचिटणी स यांच्या मार्गदर्शनात पारशिवनी तालु का अध्यक्ष रोशन फुलझेले यांनी पारशि वनीचे तहसिलदार वरुणकुमार सहारे यां ना निवेदन देऊन तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पेंच व तोतलाडोह धरणाच्या पाण्या च्या विसर्गाने पेंच व कन्हान नदिला आ लेल्या महापुरामुळे नदीकाठावर वसलेले गांव पिपरी-कन्हान,सत्रापुर, सिहोरा, खं डाळा, निलज, बोरी, शिंगारदीप, गाडेघा ट, जुनिकामठी, घाटरोहणा, डोरली, एंस बा, नांदगाव, बखारी, पिपळा, मेंहदी, न याकुंड, पालोरा,माहुली, सालई आदी गा वात पाणी शिरल्याने लोकांचे घरे बुडा ल्याने काही घरे पडले. घरातील अन्नधा न्य व जीवनावश्यक वस्तु सुद्धा वाहुन गेले. तसेच परिसरातील शेतात पाणी शिरल्याने शेतातील तुर, पराठी, धान, सोयाबीन, भाजीपाला आदी शेत पिकांचे सुद्धा नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यां वर बिकच संकट आले आहे. अश्या पुर ग्रस्त घरांचे व शेतीचे पंचनामे करुन शासनाकडुन तात्काळ नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष रोशन फुल झेले यांनी केली आहे. याप्रसंगी रामटेक तालुकाध्यक्ष शेखर भाऊ दुंडे, पारशिव नी तालुका उपाध्यक्ष नरेन्द्र पांडे, विक्की नांदुरकर, मंगेश कुंभारे, अतुल सरोदे, कमलेश नितनवरे, आनंद देशमुख आदीने उपस्थित होऊन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *