मौदा ता प्रतिनिधी। नुकताच कन्हान नदीला आलेल्या महापूर मुळे मौदा शहरातील नदीकाठी असलेल्या घरांना मोठा फटका बसला अनेक घरे पडली तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्या मुळे धान्य आणि इतर सामानाचे मोठे नुकसान झाले अनेकांचे संसार उघडे पडले सर्व पुरग्रस्त कुटुंबाची निवासाची वेवस्था जनता हायस्कुल शिवाजी प्राथमिक शाळा येथे करण्यात आली तर मौदा येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्येकर्ते मोरेश्वर सोरते व त्याच्या मित्रपरिवरतर्फे मौदा येथील राष्ट्रीय महामार्गला लागून असलेल्या टाका परिसरात पूरग्रस्त कुटुंबियाकरिता दोन्ही वेळेचे जेवण चहा नाश्ता यांची वेवस्ता केली आहे राष्ट्रीय महामार्ग दोन दिवस बंद असताना महामार्गावर थांबलेल्या वाहन चालकांच्या जेवण नास्ता पाणी यांची वेवस्ता मित्रपरिवार करून करण्यात आली होती जोपर्येंत सर्व पूरग्रस्त कुटूंबीय आपल्या घरी स्थिर होणार नाही तोपर्येंत सर्व आपद्ग्रस्तना आपल्या मित्रपरिवरतर्फे अन्नदानाचा कार्येक्रम सुरु राहणार असल्याचे मोरेशवर सोरते यांनी सांगितले
मोरेश्वरजी स्तुत्य उपक्रम, कठिण प्रसंगी गोरगरीबांच्या मदतीसाठी आपण नेहमीच पुढाकार घेतला आहे. पद नसतानाही कठीण प्रसंगात धावुन जाणा-या ख-या कार्यकर्त्यांची उशीरा का होईना पण आठवण अविस्मरणीय ठरते
आपल्या अमुल्य कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा !!