जलवृक्ष चळवळीचा श्री गणेश विसर्जनासाठी ‘चंद्रभागा आपल्या दारात’ फिरत्या जलाशयाचा आदर्श उपक्रम

दर्यापूर:- जलवृक्ष चळवळ,  दर्यापूर नगर परिषद, संत गाडगेबाबा महीला मंडळ,विविध सामाजिक संघटनाच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित आणि करोना च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रम “चंद्रभागा आपल्या दारात ” या कल्पक उपक्रमाला दर्यापूर शहरातील नागरिक आणि देशभक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला.

करोना च्या काळात स्थानिक चंद्रभागेच्या तिरावर गणेश विसर्जनाची गर्दी होवू नये.तसेच मुर्ती ची कुठलीही विटंबना न होता पर्यावरण पुरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्यापुर न.प.च्या प्रवेशद्वाराजवळ तहसीलदार डाॅ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी गिता वंजारी, ठाणेदार तपण कोल्हे, सागर गावंडे, बाबू भाई, नगरसेवक असलम घानीवाले,उध्दव नळकांडे यांचे उपस्थितीत सजवलेल्या ट्रक्टर वर विसर्जन कुंड आणि निर्माल्य रथासह उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शहराच्या विविध प्रभागातून विसर्जन कुंड व निर्माल्यरथ फिरवण्यात आले. सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6 वाजे पर्यंत या उपक्रमा द्वारे हजारो गणेश मुर्तीचे संकलन करून अरूण पाटील गावंडे यांच्या शेत तलावात गणेशाचे विधीवत विसर्जन करण्यात आले.सदर उपक्रमाला  शहरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देला व सहभाग नोंदविला. विजय विल्हेकर, राजेंद्र गायगोले, मनोज तायडे,विजय लाजूरकर, माधव देशमुख, भैया भारसाकळे, संदिप गावंडे, प्रविण कावरे गोपाल तराळ,सिंधुताई विल्हेकर, संजय भारसाकळे, ज्योती सोमवंशी, माणिकराव मानकर, विजय मेंढे, मार्कोस विल्हेकर, सदानंद तिडके , संघमित्रा खंडारे, मालीनी पाटील, गजानन देवके,देवीदास काळे, संतोष तिडके,मनोज राठी,राजु खोलकुटे,मनिष वावरे यांचे सह कार्यकर्त्यांनी उपक्रमाच नियोजन केले होते. दर्यापुर नगर पालिकेच्या कर्मचारी आणि सफाई कामगारांचा यावेळी विषेश सहभाग होता. 

Box-

हर्षीका महेश कलंत्री,अथर्व आणि रूद्र राजेश पुरी, कुमारी बायस्कार , स्वराज कोरडे,कुंज भूषण विल्हेकर या चिमुकल्या नी स्वहस्ते तयार मातीपासून तयार केलेले गणराया उपक्रमादरम्यान विषेश आकर्षण होते. तहसीलदार, मुख्याधिकारी आणि जलवृक्ष चळवळीतील कार्यकर्त्यांच्या हस्ते त्याचे कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *