नदीकाठावरील नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना आर्थिक मदत द्या-सुरेश भोयर

कामठी ता मागील तीन दिवसांपूर्वी पेंच धरणाचे 16 दरवाजे उघडल्याने कन्हान नदीला महापूर आला या पुराने नदीकाठावरील गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असून तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री .उद्धव ठाकरे, ऊर्जा व जिल्हा पालकमंत्री ना.नितीन राऊत, यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर असे की,पेंच धरणाचे 16 दरवाजे तीन दिवसांपूर्वी 6 मीटर पेंच नदीला सोडण्यात आले होते. पेंचनदी,कोल्हारनदी व कन्हाननदी चा संगम बिना येथे झाला आहे. या दोन्ही नद्यांचे व धरणाचे पाणी कन्हान नदीला आल्याने नदी तुडुंब भरून कामठी मौदा विधानसभा क्षेत्रातील नदीकाठावरील कामठी तालुका तील बिना (संगम) वारेगाव छोटी आजनी गोरा बाजार आजनी गादा सोनेगाव ( राजा ) उनगाव भामेवाडा चिकना गावातील एकूण 1800 ते 2000 हेक्टर शेतातील शेत पीक वाहून गेले तसेच मौदा तालुक्यातील झुल्लार सुकळी माथनी कुंभापूर मौदा शहर चेहडी डाहळी येसंबा नरसाळा कुंभापूर किरणापुर शिंगोरी बोरी नांदगाव चिरवा पावडदौना मोहखेडी पांजरा कोपरा वडणा पानमारा नंडगाव या अनेक गावातील एकूण 6546 हेक्टर शेतातील शेतकऱ्यांचे शेतपीक वाहून गेले आहे तसेच पाळीव जनावरे वाहून गेले व इतर मालमत्ता चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांची घरे जमीनदोस्त झाली . अश्या परिस्थितीत अनेक नागरिकांवर उपासमारीची व बेघर होण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 75000 रुपये आणि पूरग्रस्त नागरिकांना रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्वरित नुकसान भरपाईची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाचा करण्यात आली आहे याप्रसंगी जि प सदस्य ज्ञानेश्वर कंभाले जी प सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाळे जि प सदस्य शालिनी देशमुख प स सभापती मौदा दुर्गा ठवकर माजी प स सभापती मौदा राजेश ठवकर प स सदस्य सुमेध रंगारी प स सदस्य दिशा चलकापुरे दिलीप वंजारी राजेंद्र लांडे मौदा ज्ञानेश्वर वानखेडे काँग्रेस अध्यक्ष मौदा दीपक गेडाम प स सदस्य मौदा युका कामठी तालुका अध्यक्ष दिनेश ढोले इरशाद शेख अतुल बाळबुधे धर्मराज आहाके वाडेगाव सरपंच कमलाकर बांगरे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *