मौदा ता प्रतिनिधी। महाराष्ट्रात नाशिक चे द्राक्ष प्रसिद्ध आहेतसाधरणतःह नागपूर जिल्याहात संत्रा पेरू केळी मोसंबी या फळबागा दिसून येतात पण द्राक्ष च्या बागा दिसत नाही कारण विदर्भाचे हवामान या पिकाला योग्य नाही असे मानले जाते पण एक प्रयोग म्हणून धानला येथील शेतकरी आणि सामाजिक कार्येकर्ते नारायण मेश्राम यांनी घरी असलेल्या पळस बागेत चक्क काळ्या अंगुराची लागवड केली आज ही अंगुराची पळस बाग पूर्णपणे बहरली आहे आणि मोठ्या प्रमाणावर अंगुराची घळ घरासमोरील मंडपात लटकलेली दिसून येते योग्य प्रकारे लागवड केली तर या भागात सुद्धा अंगुराचे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो असे मत मेश्राम यांनी वेक्त केले