मौदा तालुक्यातील नदीकाठावरील गावचे इतरत्र पुनर्वसन करा काँग्रेस पदाधिकार्यकडून निवेदन सादर

मौदा ता ३१ ऑगस्ट प्रतिनिधी। मौदा तालुक्यातून वाहणाऱ्या कन्हान नदीकाठी अनेक गावे वसलेली आहे त्यामध्ये मोहखेडी कोटगाव वड ना या व इतर गावाचा समावेश। याावेश आहे नुकताच आलेल्या कन्हान नदीच्या महापूर मुळे वरील गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्या मुळे मोठे आर्थिक नुकसान झाले शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन मिरची धान आणि बागायती पिकाचे मोठे नुकसान झाले नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे मोठे नुकसान होत असते पावसाळ्यात या गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे या गावाचा तालुक्यासोबत संपर्क तुटतो गावांना एखाद्या बेटाचे स्वरूप येते या गावावर दरवर्षी येणारे संकट लक्षात घेता वरील गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्यात यावे या मागणीचे निवेदन जी प सदस्य सौ शालिनीताई देशमुख आणि मौदा प स सभापती सौ दुर्गाताई ठवकर याच्या नेर्तृत्वात मौदा तहसीलदार यांना सादर करण्यात आले माजी प स उपसभापती राजेश ठवकर काँग्रेस नेते राजेंद्र लांडे आणि वरील गावचे नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *