पुरग्रस्त लोकांना तत्काळ मदत करण्या ची मागणी

कन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन.

कन्हान ता.प्र.दी.३१ : – पेच व तोतलाडोह धरण तुडुं ब भरल्याने धरणाचे पुर्ण दरवाजे मोठ्या प्रमाणात उघड्यात आल्याने शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता पासुन पिपरी गा वात पाणी घुसल्याने नागरिकांचे भयंकर नुकसान झाले. या पुरग्रस्ताना झालेल्या नुकसानीचे नागरिकांना शासनाने तत्का ळ आर्थिक मदत करावी अशी मागणी कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रविण गोडे यांचा नेतृत्वात मंत्री सुनिल केदार यांना निवेदन देऊन केली आहे.
मध्यप्रदेशात सतत पाऊसाचा जोर सुरु असल्याने चौराई धरणातुन पाणी तोतलाडोहात सोडण्यात आल्याने शुक्र वारी रात्रीच्या वेळी तोतलाडोह व पेंच धरणाचे पुर्ण दरवाजे उघडुन पेच नदीने कन्हान नदीत अचानक पाण्याचा विसर्ग केल्याने पेच व कन्हान नदीला महापुर अाला. कन्हान-पिपरी नगरपरिषद व प्रशासनाने दवंडी किंवा सतर्कतेची सुच ना न दिल्याने शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता पासुन पिपरी गावाला लागुन वे कोलि खुली कोळसा खदानच्या डम्पींग मातीच्या कृत्रिम टेकडयामुळे पुराचे पा णी पिपरी गावात घुसल्याने नागरिकांची चांगलीच फजीती झाली. पुराचे पाणी पिपरी च्या राहणा-र्या नागरिकांच्या राह त्या घरात शिरल्याने स्थानिय नागरिकां नी मध्यरात्री पासुन त्यांचा कुटुंबाना बाहेर काढुन सुरक्षित स्थळी ठेवण्याचे मदत कार्य केले. पुरग्रस्ताच्या घरातील जीवनावश्यक अन्नधान्य, वस्तु, घरे डुबुन मोठया प्रमाणात नुकसान झाले. रविवार (दि.३०) ला दुपारी ४ वाजता कैबिनेट मंत्री सुनिल केदार यांनी कन्हान-पिपरी पुरग्रस्त गावांचा दौरा करून पाहणी केली असता कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रविण गोडे यांचा नेतृत्वात मंत्री सुनिल केदार यांना निवेदन देऊन तत्काळ राज्य शासना व्दारे पुरग्रस्ताना नुकसान झाल्याने आर्थिक मदत करण्या ची मागणी करण्यात आली. याप्रसंगी
कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, संजय रंगारी, नितिन मेश्राम, प्रविण माने , हरीओम प्रकाश नारायण, शुभम बावन कर, मनिष शंभरकर, सतिष ऊके, अक्षय फुले, मुकेश गंगराज आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *