पूरग्रस्त पिपरी गावाची खासदार कृपाल तुमाने यांनी केली पाहणी

कन्हान ३१ ऑगस्ट:- संततधार पावसाने पूरस्थितीची पाहणी रामटेकचे खासदार श्री कृपाल तुमाने यांनी आज केली. त्यांनी कन्हान नजीकच्या पिप्री या गावाला भेट देत नागरिकांना दिलासा दिला. यावेळी प्रशासनाला पुरामुळे झालेल्या नुकसानीचा रिपोर्ट व नागरिकांना मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी गावातील नागरिकांना सुविधा देणार असल्याचे त्यांनी संगीतले.

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नागपूर जिल्ह्यात कन्हान व तिच्या सहाय्यक सर्व नद्यांना पूर आला आहे. कन्हान नदीचे पाणी अनेक ठिकाणी मिळेल त्या दिशेने सुटले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पारशिवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषदेत सामील असलेले पिपरी गावाला कन्हान नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पिप्रीतील नागरिकांना पुराचे पाणी गावात शिरल्याने पलायन करावे लागले. पुराच्या पाण्यात अनेक घरे पूर्णता बुडली होती, अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. पूरग्रस्त पिर्प्री गावात झालेल्या नुकसानीची पाहणी रविवार रामटेकचे खासदार श्री कृपाल तुमाने यांनी केली. त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला व मदत करण्याचे सांगितले. पूरग्रस्तांना धान्याच्या कीट वाटप करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त पिप्री गावातील नागरिकांच्या राहण्याची सोय तात्पुरती जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली आहे. नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करू असे सांगितले. याशिवाय प्रशासनाला नुकसानचा सर्वे करण्याचे निर्देश दिले. यावेळी गावातील नागरिकांना सुविधा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांना पूरपरिस्थितीची माहिती दिली असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष आष्टनकर, उपजिल्हा प्रमुख वरदराज पिल्ले, युवसेनेचे पदाधिकारी शुभम डवले, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

संततधार पावसाने मध्य प्रदेशातून वाहून येणाऱ्या सर्व नदी व नाल्यांना पूर आल्याने कन्हान व तिच्या सहायक नद्यांना पूर आला. कन्हान नदीने रौद्र रूप धरण केले असतानाच पेंच नदीवरील मध्यप्रदेशातील चौराई धरणाचे दरवाजे उघडे करण्यात आले. पेंच-तोतलाडोह व नवेगाव खैरी (निम्म पेंच) धरणाचे सर्व दरवाजे दोन ते अडीच मीटरने उघडले आहेत, यामुळे पेंच नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. कन्हान व पेंच नदीच्या संगमानंतर दोन्ही नद्याचे पाणी गावात शिरले आहे. पेंच व कन्हान नदीच्या काठावरील कामठी, पारशिवनी व मौदा व कुही तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वाधिक फटका पारशिवनी व मौदा तालुक्यातील गावांना बसला आहे. मौदा तालुक्यातील सिंगारखेडी या गावालाही पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. याशिवाय मौदा येथे सखल भागातली अनेक घरे पाण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *