पेंच व कन्हान नदीच्या महापुराने पुरग्रस्ताचे भयंकर नुकसान.
कन्हान ता.प्र.दी.३०: – मध्य प्रदेशातील पाणलोट कमी झाल्याने तोतलाडोह व पेंच धरणा चा जलसाठा नियंत्रीत असुन आज सका ळ पासुन पेंचचे सोळा ही दरवाजे कमी कमी करत सायंकाळी अर्धा मिटर उघडे असल्याने कन्हान नदीचा पुर सुध्दा नियं त्रीत असुन नदी दोन्ही किनारे भरून वाहत आहे.
पेंच धरणाच्या विसर्गाने पेंच व कन्हान नदीला २६ वर्षानी महापुर आला होता. शनिवार (दि.२९) च्या मध्यरात्री पासुन पेंच धरणाचे सोळाही दरवाजे एक एक मिटर कमी करित सायंकाळी फक्त अर्धा मिटर उघडे अाहे. मध्यरात्री पर्यंत पाणी पातळी वाढली परंतु रविवार (दि.३०) च्या पहाटे सकाळ पासुन पाणी कमी होत कन्हान नदी दोन्ही थडी (किनारे) भरून वाहत असुन नदीकाठच्या खोल गट भागात पाणी असुन पुर परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने पुरग्रस्त व नाग रिकांना थोडा दिलासा मिळत आहे. मागील सहा महिन्या पासुन केरोना महा मारी संकटाशी लढत नागरिकांची दैना अवस्था असताना या महापुराने पेंच व कन्हान नदीकाठाच्या बहुतेक गावाना फटका बसुन घरे, जनावरे, जिवनाश्यक, अन्नधान्य, वस्तु आणि शेती व शेतपिका चे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने पुरग्रस्त कुंटुबाती पाहणी करून पंचनामे बनवुन शासना व्दारे यथोचित आर्थिक मदतीची मागणी होत आहे.