मा ना सुनिलबाबु केदार यांची कन्हान पिपरीच्या पुरग्रस्तांना भेट

पुरग्रस्तानी प्रशासनावर रोष व्यकत करून मदतीची मागणी.

कन्हान ता.प्र.दी.३०: – मा.श्री.सुनिलबाबु केदार मंत्री महा.राज्य यांनी नगरपरिषद कन्हान व पिपरीच्या पुरग्रस्त परिसराला भेट दिली असता येथील पुरग्रस्तानी प्रशासनावर रोष व्यकत करून उघडयावर आलेल्या कुंटुबाना शासना व्दारे त्वरित यथोचित आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
कुठल्याही प्रकारची प्रशासना द्वारे सुचना न मिळता एकाएक कन्हान नदी ला शुक्रवार (दि.२८) ला मध्यरात्री १ वा जता पुर आला. पिपरी गावा लगतच वे कोलि कामठी खुली कोळसा खदान च्या माती डम्पींग कुत्रिम टेकडयामुळे पिपरी च्या घरात पाणी घुसून घरे पाण्यात बुडा ली. स्थानिय जनप्रतिनिधी व नागरिकां नी रात्री व दिवसभर नगरपरिषदेच्या मा ध्यमातुन बचाव कार्य करून पुरग्रस्त कुंटु बाना सुरक्षित स्थळी काढुन त्यांची व्यव स्था केली. पुराच्या पाण्याने राहण्याचे घर व उदरनिर्वाहाच्या जिवना आवश्यक वस्तुचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन संपुर्ण कुंटुबे उघडयावर आल्याने हात मजुरी व हलाखीचे जिवन व्यापन करणा -या या पुरग्रस्त कुंटुबाची पाहणी करून तातडीने यथोचित आर्थिक मदत शासना व्दारे करण्यात यावी अशी मागणी निवेद न देऊन करण्यात आली. याप्रसंगी जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे, नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच पिपरी चे सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, आकाश महातो, कुंदन रामगुंडे, संजय ठाकरे, अनिल केवट, भोला भोयर, अरूण वाघमारे, कुणाल खडसे, सुषांत बर्वे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

नगर कॉग्रेस कमेटी व्दारे पुरग्रस्ताना मदतीची मागणी.

कन्हान नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र ५ व ६ च्या पिपरी, धरमनगर चे पाचशे वर कुंटुबे आलेल्या महापुराने घरे, अन्न धान्य, कागदपत्रे, जिवनावश्यक वस्तु नष्ट झाले असुन त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. बहुसंख्य लोक मजुर वर्गातील असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना सन्मान जनजीवन जगण्यासाठी तातडीने भरीव मदतीची गरज आहे. करीता झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी नगर कॉग्रेस कमेटी अध्यक्ष त़था नगरसेवक राजेश यादव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *