खासगी शाळेकडुन नियमबाह्य शुल्क वसुली

शासन आदेशाला केराची टोपली
शुल्क वसुली थांबवा शिक्षण बचाव कृती समितीची मागणी.

कन्हान ता.प्र.दी.३०: – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शा ळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु आहे. मात्र या शिक्षणाचे पैसे वसुल करण्याचा धंदा खासगी शाळांनी सुरू केल्यामुळे पालक वैतागले आहे. हा गोरखधंदा ता त्काळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षण बचाव कृती समिती तर्फे प्रशांत बाजीराव मसार यांनी दिला आहे.
राज्यात कोरोना या जीवघेणा आजा राचा तीव्र गतीने फैलाव होत आहे. त्या कारणाने राज्यातील शाळा व महाविद्या लये अद्यापही सुरू करण्यात आली नाही . पण शिक्षणात खंड पडु नये यासाठी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय अनेक शा ळांमध्ये राबविण्यात येत आहे. या आॅन लाईनच्या आडुन खासगी इंग्रजी माध्यमा च्या शाळा मोठ्या प्रमाणात शुल्क वसुल करत होते. अखेर या विषयावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा जो पर्यं त सुरु होत नाही तो पर्यंत शुल्क वसुल करु नये असा आदेश दिला. यासंदर्भात काही तक्रार निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना कार्यवाहीचे अधिकार दिले. मात्र शासनाच्या या सर्व आदेशाला धाब्यावर बसवून कन्हान येथील इंग्रजी माध्यमा च्या खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात शु ल्क वसुलीचा गोरखधंदा बिनधास्त राब वत आहे. पालकांनी फी जमा न केल्या स फोन वर निरोप देत कार्यवाहीचा धाक दाखविल्या जात आहे. खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडुन पालकांना फोन द्वारे शुल्क भरण्याकरिता लावण्यात ये णारा तगादा व मुलांच्या भविष्याबाबत च्या धमक्या तातडीने थांबविण्यात याव्यात. शासन आदेशान्वये जो पर्यंत शाळा सुरु होत नाही तो पर्यंत शुल्क वसु ल करण्यात येऊ नये, शिक्षणाधिकारी व पारशिवनी गटशिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणी तत्काळ चौकशी करून संबंधि तांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा विद्या र्थी हितार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा गर्भित इशारा शिक्षण बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य तर्फे प्रशांत बाजीराव मसार, सुनील सरोदे व इतर पालकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *