मा.ना सुनिल केदार यांची नांदगाव व साटक ला भेट

राख तलावामुळे पेंच नदीच्या पुरा ने नांदगाव,एंसबा, बखारीचे नुकसान

कन्हान ता.प्र.दी.३०: – नांदगाव व बखारी गावामध्ये खापरखेडा औष्णिक विधृत केंद्राच्या राखेचा तलाव बनल्याने पेंच धरणाच्या विसर्गाने पेंच नदी पुराच्या पाण्याने नांद गाव सभोवती पाणीच पाणी साचुन तसे च बखारी, एंसबा गावात पाणी शिरून घरे, जनावरे व शेतपिकाचे मोठे नुकसान झाल्याने मौका चौकसी करून औष्णिक केंद्राकडुन किंवा शासनाने शेतक-याना नुकसान भरपाईची मागणी मा ना सुनिल केदार कडे करण्यात आली.
मध्यप्रदेशात व तालुक्यात सतत पाव साने पेंच व तोतलाडोह धरणाचे दरवाजे शुक्रवार (दि.२८) ला रात्री जास्त उघडुन पेंच नदीने पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने पेंच नदी काठावरील बखारी, नांदगाव व एसंबा गावात मध्यरात्री पाणी शिरून गावक-यांची चांगलीच तारांबळ उडाली. नांदगाव व बखारी या गावा मध्ये खापर खेडा औष्णिक विधृत केंद्राचे राख तला व बनल्याने पेंच नदी पुराचे पाणी बखारी गावात शिरल्याने ११ घरे व शंभर एकर शेतीत पाणी साचले, नांदगावच्या सभोव ती पाण्याने वेढुन २५ घरे, १५० एकर शे तीत व एंसबा गावचे ६ घरे, ९० एकर शे तीत पुराचे पाणी साचुन भयंकर शेतकरी ,हातमजुरांचे नुकसान झाले. नांदगाव चा संपर्क तुटुन सुध्दा शनिवार दिवसभर शा सकीय अधिका-याने फिरकुन पाहिले न सल्याने येथील सृदं नागरिकांच्या माहीती ने मा ना सुनिल केदार हयानी रविवार ( दि.३०) ला सकाळी ९ वाजता मा सुनिल केदार यांनी नांदगाव ला भेट देऊन पुरग्र स्ताच्या समस्या जाणुन घेत राख तलावा मुळे पहिल्यांदाच गावात पुराच्या पाण्या ने नांदगाव, एंसबा, बखारीचे मोठे नुकसा न झाल्याचे तिन्ही ग्राम पंचायतीचा ठराव त्वरित देण्यास सांगितले. याप्रसंगी जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे, पंस सदस्या निकीता भारव्दाज, सरपंचा सोनाली वर खडे, देवाजी ठाकरे, श्यामकुमार बर्वे, सिताराम भारव्दाज, रामभाऊ ठाकरे, उपसरपंच सेवक ठाकरे, पोलीस पाटील संतोष ठाकरे, मनोज वरखडे, महावीर पु-हे, तुषार ठाकरे, आकाश रच्छोरे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

साटक ग्रा प व पशुधन शिबीरास भेट

मा ना सुनिल केदार हयानी सकाळी १० वाजता साटक येथील पशुधन वैद्य कीय शिबीर आणि ग्राम पंचायतीला भेट दिली. याप्रसंगी जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे, सभापती तापेश्वर वैद्य, तहसिलदार वरूणकुमार सहारे, जि प सदस्य व्यकट कारेमोरे, पं स सदस्या निकीता भारव्दा ज, सरपंचा सिमाताई उकुंडे, उपसरपच गजानन वांढरे, दयारामजी भोयर, यशवंतराव उकुंडे, तालुका वैद्य कीय अधिकारी, साटक पशुधन वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *