कन्हान ला एकाचा मुत्यु तर नवीन ९ रूग्ण आढळले.

कन्हान ४,कांद्री १,वराडा ४ असे ९ मिळुन कन्हान परिसर ३३२ रूग्ण

कन्हान ता.प्र.दी.२८: – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन खाज गी तपासणीत पॉझीटिव्ह आलेला कन्हा न चा ३८ वर्षीय एका रूग्णाचा (दि.२७) ला रात्री मुत्यु झाला. आज प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे ४५ लोकांच्या तपासणीत ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ३३२ रूग्ण संख्या झाली आहे.
गुरूवार दि.२७ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर ३२३ रूग्ण असुन (दि.१५) ऑगस्ट ला कन्हान च्या तपास णीत निगेटिव्ह आलेला हनुमान नगरचा ३८ वर्षीय युवक काही दिवसानी नागपु र च्या खाजगी तपासणीत पॉझीटिव्ह आल्याने खाजगी उपचार सुरू असताना प्रकृती जास्त खालावल्याने गुरूवार (दि २७) ला उमरेड रोडवरील खाजगी दवा खान्यात नेताना वेंटीलेटर न मिळाल्याने रात्री त्याचा मुत्यु झाला. मृतदेहाचा रात्री च अंतिम संस्कार करण्यात आला. आज शुक्रवार (दि.२८) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला४५ रॅपेट व१५ स्वॅब असे ६० लोकांची तपासणी करण्यात आली. यात कन्हान च्या मृतकांच्या घरचे ३ व इतर १ मिळुन ४, कांद्री १, वराडा ४ असे कन्हान परि सर एकुण ९ कोरोना बाधित रूग्ण आढ ळले. आता पर्यत कन्हान १६४, पिपरी २७, कांद्री ६८, टेकाडी कोख ३३, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनि कामठी ९, असे कन्हान ३१४ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, डुमरी ३, वराडा ६ असे साटक केंद्र १८ मिळुन कन्हान परिसर एकुण ३३२ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ५, कांद्री ३ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात ८ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

कन्हान अपडेट : – कोरोना रूग्ण

मागील एकुण रूग्ण – ३२३
२७/८/०० ला मुत्यु – १
आज पॉझीटिव्ह आले – ९
आज पर्यंत पॉझीटिव्ह – ३३२
बरे होऊन घरी आले – १९८
सध्या कोरोना बाधित – १२६
मुत्यु एकुण – ८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *