संविधान चा अपमान करणा-या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

निखिल रामटेके मित्र परिवार व्दारे पोलीस अधिका-याना निवेदन.
कन्हान ता.प्र.दी.२६: – गणेश चतुर्थी च्या दिवसी अभिनेता प्रविण तराडे हयानी भारतीय संविधानावर श्री गणेश मुर्ती ठेऊन फोटो, व्हिडीओ काढुन सोशल मिडियावर व्हा यलर केल्याने आबेंडकर चळवळी व्दारे तराडे चा जाहीर निषेध करून त्यांचे वि रूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निखिल रामटेके मित्र परि वार व्दारे कन्हान पोलीस अधिका-याना निवेदन देऊन केली आहे.
शनिवार (दि.२२) ला गणेश चतुर्थी च्या दिवसी कोथरुड शास्त्री नगर पुणे चे रहिवासी गैरअर्जदार अभिनेता प्रवीण तराडे यांनी पाठा प्रमाणे भारतीय संवि धानावर श्री गणेशजी की मुर्ती ठेऊन फोटो, व्हिडियो काढुन सोशल मीडिया व्हायरल केल्याने संपुर्ण देशातील आंबे डकर चळवळी व्दारे संताप व्यकत करू न या घटनेचा जागो – जागी जाहिर निषे ध करण्यात येत असल्याने कन्हान शहरा चे निखिल रामटेके मित्र परिवार व्दारे या घटनेचा जाहिर निषेध करून कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक हयाना निवेदन देऊन गैरअर्जदार प्रवीण तराडे विरूध्द देश द्रोहा गुन्हा दाखल करण्याची मांगणी करण्यात आली. याप्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, विनायक वाघधरे, सामाजिक कार्यकर्ता निखिल रामटेके, प्रशांत वाघमारे, मनिष भिवगडे, स्वप्नील वाघधरे, सतीश भसार कर,सोनु खोब्रागडे, रंजनिश मेश्राम, सोनु मसराम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *