कन्हान ला सार्वजनिक १४ व घरघुती ६२१ श्री गणेशाची पुजा अर्चना

कन्हान ता.प्र.दी.२४ : – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाच्या प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करित कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ३० गावात फक्त सार्वजनिक १४ व घरघुती ६२१ गणेश मुर्ती स्थापन करून कोरोना हद्दपार कर ण्याकरिता श्री गणेश मुर्ती स्थापन करून १० दिवस पुजा अर्चना भाविक करित आहे.
शनिवार (दि.२२) ला कन्हान शहर व ग्रामिण परिरातील ३० गावा पैकी सार्वज निक गणेश मंडळाने शहरात ४, ग्रामिण १० असे १४ तर घरघुती ६२१ श्री गणेश मुर्ती स्थापन करून संपुर्ण मानवाच्या कल्याणार्थ कोविड-१९ ( कोरोना विषाषु ) महामारी चे संकंट हद्दपार करण्याकरि ता विघ्नहर्ता, सुखकर्ता श्री गणेशा ला साकडे घालुन भाविक मंडळी शासना च्या नियमाचे पालन करून शांतेत गर्दी न करता १० दिवस मनोभावे पुजा अर्चना करून श्री गणेश उत्सव साजरा करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *