मौदा येथिल कवी कैलास बनकर यांचे अपघाती निधन

मौदा २४ ऑगस्ट ता प्र.संपूर्ण तालुक्यात सुपरिचित असलेले कवी ,चित्रकार व पत्रकार कैलास बनकर (वय- ४२) यांचे आज सायंकाळी ४ वाजता च्या वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील माथनी टोल नाक्याजवल अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मौदा येथे त्यांचे प्रिंटिंग चे दुकान होते. काही कामानिमित्त ते आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 40 बी पी 7648 ने जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात ते जागीच ठार झाले. मौदा पोलिसांनी शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नागपूर मेयो ला पाठविले.
त्यांचे मूळ गाव तारसा असून मागील अनेक दिवसांपासून मौदा येथे वास्तव्याला होते. त्याचे मागे एक मुलगी पत्नी असून एक दिलखुलास वेक्ती प्रतिभावंत कवी म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. त्यांच्या अपघाती निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *