देशी कट्टा , ४ काडतुस, दोन तलवार सह एक आरोपीस अटक

कन्हान पोस्टे चे सपोनि मेश्राम सह गुन्हे पथकांची कारवाई.

कन्हान ता.प्र.दी.२३ : – पोलीसानी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीवरून शिवमंदी र फुकटनगर कांद्री येथे आरोपी परशुरा म गौतम याचे जवळुन घातक शस्त्र एक देशी कट्टा,४ काडतुस, दोन तलवार असा एकुण २७ हजार रूपयाचा मुद्देमालासह आरोपीस अटक केली.
रविवार (दि.२३) ला सायंकाळी ५. ३० ते ७ वाजता दरम्यान कन्हान पोलीस स्टेशनचे सपोनि सतिश मेश्राम व गुन्हे पथक पेट्रोलींग करित असताना खात्री शीर गुप्त माहीती मिळाल्याने फुकटनगर शिवनगर जवळ कांद्री येथील युवक अवै द्यरित्या शस्त्र बाळगुन फिरत असल्याने पोलीसानी तेथे पोहचुन आरोपी परशुरा म मखगु गौतम वय २९ वर्ष रा शिवनगर फुकट नगर वार्ड क्र ४ कांद्री यास थाबवु न झडती घेतली असता त्याचे जवळ ए क देशी बनावटी कट्टा किंमत १७ हजार रू. ४ जिवंत काडतुस किमत २ हजार रू मिळाल्याने त्यांच्या घरी शोध घेतला असता दोन तलवार किंमत ८ हजार रू असा एकुण २७ हजार रूपयाचे घातक शस्त्रा अवैद्यरित्या बाळगत असल्याने आरोपीस पोलीस स्टेशन कन्हान ला आणुन आरोपी विरूध्द कलम ३/२५, ४/२५ , सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सदर कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात सपोनि सतिश मेश्राम, गुन्हे पथक पोहवा, येशु जोसेफ, राहुल रंगारी, संजय बरोदिया, मुकेश वाघाडे, सुधिर चव्हाण, संदीप गेडाम आदीने सक्रिय सहभाग घेत केली. पुढील तपास सपोनि सतिश मेश्राम करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *