मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाची माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली पाहणी

अमरावती २३ ऑगस्ट:- शेतकऱ्यांवर वारंवार संकटाचा सामना करावा लागत आहे आता मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकावर दुसरं संकट आलं आहे. आधी सोयाबीन पिकं उगवलं नाही जे उगवलं त्याच्यावर खोडकिड्याने मारा केला आहे आज मोर्शी तालुक्यातील लाडकी या गावात माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाअध्यक्ष डॉ अनिल बोडे यांनी या सोयाबीन पिकाची पाहणी केली व ह्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना मद्दत करण्याची मागणी सुद्धा राज्य सरकारला केली.
अमरावती विभासगामध्ये सोयाबीन न उगवल्याच्या 30 हजाराच्या वर तक्रारी दाखल झाल्या होत्या परंतु त्यातही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यातच आता ह्याच सोयाबीन पिकाची खोडकीड ह्या नावाच्या किड्याने पिकाचे नुकसान केले आहे. हा किडा मुळापासून रस रोखून घेतो आणि पिकांना शेंगा येत नाही व पीक हे पिवळे पडतात व त्यामुळे शेतऱ्याला खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे ह्या कृषिविभागांनी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे व ह्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत दयावी अशी मागणी माझी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *