कन्हान नगरपरिषद ला त्वरित स्थायी मुख्याधिकारी देण्याची मागणी

कन्हान शहर विकास मंच व्दारे जिल्हाधिकारी मा ठाकरे ना निवेदन.

कन्हान ता.प्र.दी.२१: – नगरपरिषद कन्हान पिपरी येथे मा रविंद्र ठाकरे हयानी भेट दिली असता कन्हान शहर विकास मंच व्दारे कन्हान शहरात कोरोना रूग्णाची संख्या वाढत असताना सुध्दा वीस दिवसा पासु न मुख्याधिकारी विना नगरपरिषद अस ल्याने त्वरित स्थायी मुख्याधिकारी देण्या ची मांगणी निवेदन देऊन करण्यात आली.
कन्हान शहरात कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन आता पर्यंत नगरपरिषद कन्हान पिपरी ला दिड शे च्या वर रूग्ण संख्या पोहचली आहे. दि ३० जुन ला नविन मुख्याधिकारी ची नियुक्ती झाल्याने प्रभारी मुख्याधिकारी संदीप चिंद्रेवार हयानी पदभार सोडला परंतु वीस दिवस होऊन सुध्दा नवीन मुख्याधिकारी रूजु झाले नसुन या कोरो ना च्या बिकट परिस्थित नगरप्रशासना वर कुणाचेही दडपण नसुन नागरिकांना टाळाटाळीचा सामाना करावा लागत आहे. अशीच परिस्थिती जास्त वेळ राहिल्यास कोरोनाचा झपाटयाने वाढ होऊन नियंत्रणा बाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. शहरातील नागरिकांचा सुरक्षेच्या दुष्टीने गांर्भियाने लक्ष देऊन नगरपरिषद कन्हान-पिपरी ला कर्तव्य दक्ष स्थायी मुख्याधिकारी त्वरित द्यावा. अशी मागणी नगरपरिषदेची शासकीय अधिकारी यांची बैठक संपल्यावर मा रविंद्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपुर याना कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे च्या नेतृत्वात शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. याप्रसंगी उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, संजय रंगारी, शाहरुख खान, नितिन मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *