कामठी २१ ऑगस्ट:-लवकर आता आपले विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचे आगमन होणार आहे गणपती आगमन सोबत पर्यावरण कसे सुरक्षित राहील या करिता खूप प्रयत्न केले जाते तयात प्लास्टर ऑफ पॅरिस वर सरकार ने बंदी घातली आहे परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणपती कमी किमतीत मिळत असल्या कारनामुळे लोकांचा ओढा त्याकडे जास्त असतो मातीचे गणपती त्या तुलनेत महाग असतात व पर्यावरण पूरक असतात त्याकडे लोकांचा ओढा वाढावा व या मातीचे गणपती चे विसर्जन घरीच व्हावे व आपले पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे या करिता युवा चेतना मंच अभिषेक सावरकर व कुशांक गायकवाड यांच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे मंच तर्फे मातीची मूर्ती विक्री केंद्र उघडण्यात आले आहे व जो ही मूर्ती विकत घेईल तयाला एक कुंडी , खत मिश्रित माती आणि फुल झाडाचे बी मोफत देण्यात येणार आहे व लोकांना सांगण्यात येत आहे की आपण मातीची मूर्ती विकत घ्यावी व त्या मूर्ती चे विसर्जन घरी करावे व गणपती ची माती आम्ही दिलेल्या कुंडीत टाकावी व त्यात खत मिश्रित माती टाकावी व दिलेले बी लावावे व झाड रुपी गणपती आपल्या स्मरणात ठेवावा ही या मागची भूमिका आहे या मुळे आपले नसर्गिक पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होणार नाही व पर्यावरण चांगले राहील
यासाठी युवा चेतना मंच चे शहर सचिव भूषण वानखेडे ,प्रज्वल अवचट वेदांत गेटमें प्रयत्न करीत आह