मौदा ता २० ऑगस्ट:- मौदा तालुक्यात वाढत असलेली कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता माजी ऊर्जा मंत्री मा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मौदा येथील आय टी आय मध्ये असलेल्या कोविड केंद्राला भेट दिली व तेथील डॉक्टर चमू सोबत चर्चा केली या केंद्रावर सुविधांचा अभाव असल्यामुळे बावनकुळे यांनी नाराजी वेक्त केली यावेळी त्याच्यासोबत कामठी मौदा क्षेत्राचे आमदार मा टेकचंद सावरकर मौदा तहसीलदार प्रशांत सांगळे मौदा नगरपंचायत पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील नागरिकांनी सोशल डिस्टिंग मास्क व सर्व नियमाचे पालन करावे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले