विना परवाना शस्त्र बाळगणा-या दोघाना अटक

कन्हान ता.प्र.दी.२०: – पोलीस स्टेशन अंतर्गत पोळा सणाच्या पाश्वभुमिवर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने नांका नं.७ येथे आरो पी रूपेश सहारे हा चाकु व बोरडा शिवा रात आरोपी सरोज मदनकर हा तलवार स्वत: जवळ अवैद्यरित्या बाळगुन दहशत निर्माण करताना मिळुन आल्याने गुन्हे पथकानी दोन्ही कारवाईत आरोपीला अटक केली.
सोमवार (दि.१७) ला सायंकाळी ८. ४५ ते ९.४५ दरम्यान आरोपी रूपेश राजु सहारे वय २१ वर्ष रा कांद्री वार्ड न २ हा स्वत: जवळ कोणत्यातरी दखल पात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने विना पर वाना अवैद्यरित्या हातात चाकु घेऊन गावात दहशत निर्माण करताना मिळुन आल्याने आरोपी विरूध्द ४, २५ भा ह का अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली असुन पुढील तपास पोहवा येशु जोसेफ पुढील तपास करित आहे.
बोरडा शिवारात (दि.१८) ला सायं काळी ८ ते ८.४५ वाजे दरम्यान आरोपी सरोज सिताराम मदनकर वय १९ वर्ष रा निमखेडा हा स्वत: जवळ कोणत्यातरी दखल पात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने वि ना परवाना अवैद्यरित्या हातात शस्त्र (तलवार) घेऊन गावात दहशत निर्माण करताना मिळुन आल्याने आरोपी विरू ध्द ४, २५ भा ह का अन्वये गुन्हा नोंद करून अटक केले असुन पुढील तपास थानेदार अरूण त्रिपाठी पुढील तपास करित आहे. या दोन्ही कारवाई थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे गुन्हे पथकाचे पोहवा येशु जोसेफ यांच्या नेतुवात पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *