गुन्हे अन्वेशन शाखा (ग्रा) नागपुर पथकाची कारवाई.
कन्हान ता.प्र.दी.२० : – पोलीस स्टेशन अंतर्गत धरम नगर कन्हान येथे गुप्त माहीती वरून गुन्हे अन्वेशन शाखा (ग्रा) नागपुर पथका ने धाड टाकुन ची आरोपी आकाश यश वंत गरडे यांचे जवळुन अवैद्य ९६ देशी दारू च्या निप किंमत ७६२० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीसह कन्हान पोलीसाच्या ताब्यात दिले.
पोळा सणाच्या पाश्वभुमिवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दुष्टी ने जिल्हयाचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने गुन्हे अन्वेशन शा खा नागपुर पोलीस निरिक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतुवात पथकाने गुप्त सुत्राच्या माहितीवरून कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत धरमनगर कन्हान येथे मंगळवार (दि.१८) सायं ४.१५ वाजता धाड टाकुन आरोपी आकाश यशवंत गरडे वय २२ वर्ष धरमनगर कन्हान यांचे जवळुन अवैद्य ९६ देशीदारू च्या निप किंमत ७६२० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून देशीदारू व आरोपीस पकडुन कन्हान पोलीसाच्या स्वाधिन केले. ही कारवाई गुन्हे अन्वेशन शाखा ग्रामिण नागपुरचे पोलीस निरिक्षक अनिल जिट्टावार, सपोनि वरघडे, दुबे, परमार, बर्वे, यादव, बन्फर, बहाले आदीने सक्रिय सहभाग घेतला.