कोराडी कुटूंबाची हत्या की आत्महत्या पोलीस समोर आव्हान , सुसाईड नोट मध्ये रहस्य

कोराडी १८ ऑगस्ट:-नागपूर कोराडी उच्चशिक्षित दाम्पत्यानं दोन गोंडस मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ४२ वर्षीय प्रा. धीरज राणे, ३८ वर्षीय पत्नी डॉ. सुषमा राणे, मुलगा ११ वर्षीय ध्रुव आणि ८ वर्षीय लावण्या राणे अशी मृतांची नावे आहेत. कोराडी भागातील ओम नगर राहणाऱ्या चौघांचे मृतदेह त्यांच्या खोलीत आज दुपारी आढळून आले .
पत्नी सुषमा राणे धंतोली भागातील रुग्णालयात
कार्डियालॉजिस्ट म्हणून कार्यरत होत्या, तर धीरज इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये लेक्चरर मनुन होते.
पत्नी सुषमा राणे यांचा मृतदेह पंख्याला गळफास लावल्याच्या अवस्थेत तर पती आणि मुलं बेडवर पडून होते.
मिडल्या माहिती अनुसार मृतक धीरजची आत्या पण सोबत राहत होती आज सकाळी ११ च्या सुमारत आत्या सोबत मृतक पत्नी सुषमा चे आत्या सोबत बोलणे झाले होते आणि काही तासातच ही धक्कादायक घटना आत्याला कळाली,पोलिसाला मृत्य देह जवड सुसाईड नोंद मिडळाची चर्चा जोर्यात आहे तर ही हत्या की आत्महत्या आहे पोलीस समोर मोठे आव्हान ठरले आहे तर या घटना मुळे सुखी संसाराची अचानक राखरांगोळी झाली. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जातेय. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून कोराडी पोलीस तपास करताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *