कन्हान ८, जुनिकामठी ४ व आमडी १ असे कन्हान परिसर १३ रूग्ण

कन्हान परिसर १३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण २३० रुग्ण.

कन्हान ता.प्र.दी.१८: – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान १२, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक १ असे कन्हान परि सर एकुण १३ रूग्ण आढळुन एकुण २३० रूग्ण संख्या झाली आहे.
रविवार दि.१६ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर २१७ रूग्ण असुन आज सोमवार (दि.१७) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला ४३ लोकांची रॅपेट तपासणी करण्या त आली.यात कन्हान ८, जुनिकामठी ४ असे १२व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ११ लोकांची रॅपेट टेस्ट घेण्यात आली. यात आमडीचा १ रूग्ण पॉझीटिव्ह अाढ ळल्याने कन्हान परिसर एकुण १३ कोरो ना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान ११८, पिपरी २७, कांद्री ३४,टेका डी कोख २३, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगा व खदान २, खंडाळा १, जुनिकामठी ४ असे कन्हान २२१ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, मिळुन साटक केंद्र ९ असे कन्हान परिसर एकुण २३० रूग्ण संख्या झाली आहे. यातील आता पर्यंत कन्हान शहरात ४, कांद्री २ रूग्णा चा मुत्यु होऊन कन्हान परिसरात एकुण ६ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *