गणेश चतुर्थी करिता शुक्रवारी सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्या.

कन्हान कांद्री दुकानदार महासंघा ची नगराध्यक्षा, थानेदारांना निवेदन.

कन्हान ता.प्र.दी.१७ : – कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कन्हान आठवडी बाजार व सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. परं तु येत्या शनिवार (दि.२२) ला गणेश चतु र्थी असल्याने कन्हान परिसरातील गाव करी व नागरिकांना घरघुती गणेशोत्सवा करिता खरेदी विक्री करिता येणारा शुक्र वार आठवडी बाजाराच्या दिवसी सर्व दुकाने सुरू ठेवणे आवश्यक आहे. या नंतर दर शुक्रवारला नियमा प्रमाणे आठ वडी बाजार व दुकाने बंद ठेवण्यात येईल . करिता सर्व दुकानदार व नागरिकांच्या सोयी सुविधेचे गांर्भिय लक्षात घेत कन्हा न कांद्री दुकानदार महासंघाव्दारे निवेद नाने विनंती करण्यात येत आहे की,येत्या शुक्रवारी गणेश चतुर्थी निमित्य आठवडी बाजार व सर्व व्यापारी प्रतिष्ठान आणि दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. अशी विनंती कन्हान कांद्री दुकानदार महासंघाचे शिष्टमंडळाने नगराध्यक्षा मा करूणाताई आष्टणकर व पोलीस उपवि भागीय अधिकारी संजय पुजलवार, थाने दार अरूण त्रिपाठी हयाना निवेदन देऊन केली आहे. शिष्टमंडळात कन्हान कांद्री दुकानदार महासंघाचे अध्यक्ष अकरम कुरेशी, सचिव प्रशांत मसार, सचिन गजभिये, योगेश डोईजड, शंकर हलमारे, कोमल अग्रवाल, प्रदीप गायकवाड, दिपक तिवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *