कन्हान ता.प्र.दी.१७ : -राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या का र्यकर्ता बैठकीत राष्ट्रवादी नेते मा. प्रफुल पटेल व मा अनिलबाबु देशमुख यांच्या हस्ते बोरडा (गणेशी) येथील सेवानिवृत पोलीस पाटील श्रीराम नांदुरकर व निम खेडाचे सामाजिक कार्यकर्ता देविदास तडस हयानी आपल्या सहकार्यासह राष्ट्र वादी कॉग्रेस पार्टी मध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची प्रेस क्लब नागपुर येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत
रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेल सरे यांच्या नेतुत्वात बोरडा (गणेशी) चे सेवानिवृत पोलीस पाटील श्रीराम नांदुर कर व निमखेडाचे सामाजिक कार्यकर्ता देविदास तडस हयानी आपल्या सहका र्यासह राष्ट्रवादीचे नेते मा. प्रफुल्ल पटेल साहेब, गृहमंत्री मा.अनिलबाबु देशमुख, निरिक्षक राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष शिवरा ज (बाबा) गुजर, माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रशांत पवार, गणेश पानतावने आदी मान्यवराच्या उपस्थित राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी मध्ये प्रवेश घेतला. बोरडा चे श्रीराम नांदुरकर व निमखेड़ा चे देवी दास तडस आणि सहकार्यानी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतल्याबद्दल राकॉ पारशिव नी तालुका कार्याध्यक्ष पुरणदास तांडेकर , पुरुषोत्तम पोटभरे, तुळसीराम डोकरी मारे हयानी अभिनंदन केले.