कन्हान ता.प्र.दी.१७: – स्वातंत्र्य दिनी घाटरोहना येथे सहारा हेल्प फार यु फाऊंडेशन व्दारे नुतन सरस्वती हायस्कूल कांद्री येथील दहावी उत्तिर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्का र करण्यात आला.
संस्थे द्वारा सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर हुतात्मा, महापुरूषांच्या प्रतिमेला माल्या र्पण व मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरु वात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सतीश उके, सचिव प्रा. महेश शेंडे हया नी घाटरोहणा येथील १० वी चे गुणवंत विद्यार्थी कु.अनिशा तांडेकर, कु. अश्विनी तांडेकर, कु. महेक तांडेकर, कु. हिना चव्हाण, कु.स्वाती छानीकर व कुणाल तांडेकर आदीचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक देऊन सत्कार करण्या त आला. याप्रसंगी मनीष शंभरकर, सोनु खोब्रागडे, राजेश गांजवे, दिनेश कडंबे, योगेश मोहोळ, शुभम डोंगरवार आदी पदाधिकारी तथा विद्यार्थ्यांचे पालक प्रामु ख्याने उपस्थित होते.