कन्हान १६ ऑगस्ट : – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान ९ प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ८ असे कन्हान परि सर एकुण १७ रूग्ण आढळुन एकुण २१७ रूग्ण संख्या झाली आहे.
शुकवार दि.१४ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर २०० रूग्ण असुन शनिवार (दि.१५) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला ६५ लोकांची रॅपेट तपासणी करण्या त आली.यात कन्हान ३,कांद्री ५, टेकाडी कोळसा खदान नं ६ चा १ असे ९ व प्राथ मिक आरोग्य केंद्र साटक व्दारे (दि१३) ला लोकांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यात साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी १ असे एकुण ८ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आणि १५ ला ८ रूग्णाच्या संपर्कातील ४७ लोकांची रॅपेट तपासणी केली असता सर्व निगेटिव्ह निघाले.आता पर्यत कन्हान ११०, पिपरी २७, कांद्री ३४, टेकाडी कोख २३, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १ असे कन्हान २०९ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी १ साटक केंद्र ८ असे कन्हान परिसर एकुण २१७ रूग्ण संख्या झाली आहे. यातील आता पर्यंत कन्हान शहरात ४, कांद्री २ रूग्णा चा मुत्यु होऊ न कन्हान परिसरात एकुण ६ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र साटक अंतर्ग त ८ रूग्ण आढळल्याने चारही गावात तहसिलदार वरूणकुमार सहारे,प. स उप सभापती चेतन देशमुख, प स सदस्या निकीता भारव्दाज, साटक सरपंचा सिमा ताई उकुंडे, साटक वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली हिंगे, डॉ प्रज्ञा आग्रे, सुपरवाई झर सोनट्टके, मंगेश खोडे, उईके, रोडे सिस्टर, परागे सिस्टर, चव्हाण सिस्टर, डोणारकर, डोईफोडे, कल्पना निमकर, जितु लच्छोरे, सचिव लिलाधर सोनवाने, मनिष कटरे, खोडवे सह आशा वर्कस, आगणवाडी सेविका आदीने सर्वे दौरा करून आठही रूग्णाना त्याच्या घरीच होम क्वोरंटाईन करून प्राथमिक आरोग्य केंद्र साटकच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे.