वृक्षारोपण करून युवा चेतना मंचाने साजरा केला स्वातंत्र्यदिन

कामठी ता.१६ ऑगस्ट:-युवा चेतना मंच ने ७४वा स्वातंत्र्य दिन हा देश के लिए जिये समाज के लिए जिये हि उक्ती सार्थ ठरवत स्वातंत्र्य म्हणजे जवाबदारी याची जाणीव ठेवत रनाळा येथे महावीर नगर उघानात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी पर्यावरण च्या रक्षणाची आपल्या प्रत्येकाची जवाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले.राष्ट्र ध्वजाला साक्ष ठेवून पर्यावरण रक्षणासाठी कार्य करण्यास सर्वांनी तत्पर राहवे अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी प्रा.पराग सपाटे, अक्षय खोपे, बंटी पिल्ले,विजय आगरकर, बाँबी महेंद्र, निरज खोरगडे, यशवंतजी आरेकर सर,अमोल नागपूरे, अतुल चोरघडे, श्रींकात अमुतकर, शिव कुशवाह, गौतम पाटील, रुपेश चकोले, अतुल ठाकरे,अमोल श्रावणकर,उमेश गीरी, आशीष हिवरेकर,कमलाकर नवले,डॉ. निखिल अग्नीहोत्री,आदी प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *