रस्त्याची दुरवस्था जनप्रतिनिधी चे दुर्लक्ष अधिकारी कुंभकर्णी झोपेत

मौदा ता प्र। मौदा तालुक्यात अनेक गावखेड्यानं जोडणारे रस्ते मोठया प्रमाणावर उखडले असून अनेक रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे पण या रस्त्यावर साधा मुरून टाकण्याचे सौजन्य अधिकारी दाखवत नाही विशेष म्हणजे तालुक्यात असलेले डझनभर जनप्रतिधी याच मार्गाने आवगमन करत असून त्यांना हे उखडले रस्ते दिसत नसावे का हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे आज या मार्गाने मोठ्या प्रमाणात दस चक्का वाहनाने गौण खनिज वाहतूक केली जाते पण याकडे पोलीस विभाग महसूल विभाग आणि बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे पण
त्याचा त्रास हा गावखेड्यातील सामान्य नागरिकांना होत आहे तालुक्यातील केसलापूर ते मौदा टी पॉईंट मौदा शहरातून धामणगाव आजनगाव मार्ग बोरगाव धानला मार्ग मौदा ते मोहखेडी मार्ग अशा अनेक मार्गावर मोठमोठे मोहमोठे खड्डे पडले आहे या खड्यात पावसाचे पाण्याचे मोठ्या प्रमाणात संचयन झाल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते पण निवडणूक प्रचारादरम्यान जनतेची सेवा करण्याचा आव आणणारे जनप्रतिधी मात्र नागरिकांच्या या समस्से कडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र मौदा तालुक्यात दिसून येते सत्ताधारी आणि विरोधक मात्र आम्ही मारल्यासारखे करतो आणि तुम्ही रडल्यासारखे करा असाच काहीसा प्रकार होताना दिसतो आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *