गुमथी पी.एच.सी केंन्द्र येथे जि.प सदस्य ज्ञानेश्वर कंभाले हस्ते झेंडा वंदन

कोराडी १५ ऑगस्ट :- आज गुमथी येथील पी.एच.सी केंन्द्रमध्ये येथे प्रमुख पाहुणे
श्री ज्ञानेश्वर कंभाले जिल्हा परिषद सदस्य कोराडी यांचा हस्ते “झेंडा वंदन” करण्यात आले. यावेळी सर्व राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कोविड १९ महामारी च्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क घालून सोशल डिस्टंसिंगचे पालन केले. या प्रसंगी उपस्थित माजी सभापती सुधाकरजी तकीत, गुमथी सरपंच गणेश ठाकरे ,पी.एच.सी चे डॉ.राहुल राऊत आदी मान्यवर व गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *