कन्हान १४ ता.: – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान येथील लॅब टे कनिशियन च्या संपर्कातील नागपुर ३,कामठी १, कन्हान २,टेकाडी खदान नं ६ चा १,खंडाळा उपकेंद्राची नर्स १ तर नागपुर तपासणीत कांद्रीची म्हातारी महिला १ असे कन्हान परिसर ५ व कामठी,नागपुर ४ रूग्ण आढळुन आता पर्यंत कन्हान परिसर एकुण २०० रूग्ण संख्या झाली आहे.
गुरूवार दि.१३ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर १९५ रूग्ण असुन आज शुक्रवार (दि.१४) ला मुकबंधिर शाळा कांद्रीला ५३ लोकांची रॅपेट व १४ स्वॅब तपासणी करण्यात आली.यात प्राथमिक आरोग्य केंद्राची लॅब टेकनिशियनच्या सं पर्कातील नागपुरचे ३, कामठी १,कन्हान २, टेकाडी कोळसा खदान नं ६ चा १,खंडाळा प्राथ. उपकेंद्राची नर्स १ असे ८ व नागपुर तपासणीत कांद्रीची म्हातारी महिला १ असे एकुण ९ कोरोना बाधित रूग्ण आढळले. यात कन्हान १०७, पिपरी २७,कांद्री २९, टेकाडी कोख २२, बोर डा १,मेंहदी ८,गोंडेगाव खदान २, खंडा ळा १ असे कन्हान परिसर एकुण २०० रूग्ण संख्या झाली आहे. यातील आता पर्यंत कन्हान शहरात ४,कांद्री २ रूग्णा चा मुत्यु होऊन कन्हान परिसरात एकुण ६ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.