कन्हान नगरपरिषद येथे सेतु केंद्र पुर्वरत सुरू

कन्हान ता.प्र.दी.१३ : – येथील नगरपरिषद कन्हान-पिपरी बचत भवनातील बंद असलेले सेतु केंद्राचे उदघाटन करून पुर्वरत सुरू करण्यात आले.
नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे सेतु केंद्र हे मागील ६ ते ८ महिन्या पासुन मत मोजणी व तांत्रिक कारणांमुळे बंद होते. त्यानंतर कोरोना महामारीचे संकट पाह ता सेतुकेंद्र सुरू करण्यात आले नव्हते. परंतु १० वी,१२ वी चा लागलेला निकाल पाहता विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेश प्रक्रिया व पुढील शिक्षणात त्रास होणार नाही ही बाब तहसीलदारांनी लक्षात घेऊ न सेतु केंद्र पुर्वरत सुरू करण्याची परवा नगी दिल्याने नगर परिषदेच्या बचत भव नच्या मागील रूम मध्ये सेतु केंद्राचे उद्घा टन नगराध्यक्षा करुणाताई आष्टनकर, उपाध्यक्ष योगेश रंगारी यांच्या हस्ते फित कापुन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बा बासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण अर्पण करून सेतुकेंद्र पुर्वरत सुरू करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेता राजेंद्र शेंदरे, पत्रकार मोतीराम रहाटे, मुख्याध्यापिका विशाखा ठमके, नगरसेवक मनिष भिवगडे,अनिल ठाकरे, नगरसेविका संगिता खोब्रागडे, सुषमा चोपकर, अनिता पाटील, गुंफा तिडके, कल्पना नितनवरे, मोनिका पौनिकर, रेखा टोहणे, वर्षा लोंढे, माजी नगरसेवक गणेश भोंगाडे, प्रेम रोडेकर, अजय लोंढे, शरद वाटकर, शक्ती पात्रे आदीसह सामा जिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, विद्या र्थी व पालक उपस्थित होते. कन्हान परि सरातील नागरिकांना कागद पत्राच्या का माकरिता पारशिवनी व रामटेक जाण्या चा त्रास नाही व सेतु केंद्रामुळे वेळ, पैशा ची बचत होईल आणि मानसिक त्रास हो णार नाही. सेतुकेंद्रा मार्फत सर्व प्रकारची शासकीय सुविधा, महत्वाचे जाती प्रमाण पत्र, नॉन क्रिमिलियर, डोमासाईल, नॅशनॅ लिटी, वय, अधिवास प्रमाणपत्र असे वि विध प्रमाणपत्र तसेच सर्व प्रकारचे शपथ पत्र, प्रतिज्ञापत्र, उत्पन्नाचा दाखला, शेती चे ७/१२, राशन कार्ड वरिष्ठ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणबाळ योजना, संज य गांधी निराधार योजना व सर्व शासकी य योजनेचा लाभ व कामे करून मिळेल व इतर विविध शासकीय योजनेचे अर्ज सुद्धा भरता येईल. अशी माहिती केंद्र सं चालक श्री सतीश भसारकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *