राधे-कृष्णा ची वेशभुषेत जन्माष्टमी साजरी केली
सावनेर ता.प्र.दी.१३- हिन्दू धर्माचे गिता हा महान ग्रंथ लिहणारे व संपूर्ण मानवाला जिवणाचे मार्गदर्शन करणारा असा हा ग्रंथ रचीते भागवत गीता श्रीकृष्ण यांच्या हा जन्म दिवस आज कोरोना च्या काळात सावनेरात सर्व श्रीकृष्ण प्रेमींने सहकुंटुबाने आप-आपल्या घरी असलेल्या छोट्या बालकांना श्रीकृष्ण च्या पेहराव करून आनंदाने साजरी केली जणू साक्षात श्रीकृष्णच घरी अवतारले अशा प्रकारे चित्र व आनंद निर्माण झाले होते.
तसेच घरी छोट्या देवघराजवळ पाळणा करून त्या मध्ये श्रीकृष्णाच्या मुर्तीला स्थापित करुण त्याचे विधिवत पुजन करुण घरच्या घरीच भजन पुजन करुण साजरा करण्यात आला.
प्रचलित प्रथे प्रमाणे रात्रीला बाराच्या ठोक्यावर “हाथी घोडा पालकी,जय कन्हैया लाल की” चा एकच जयघोष टाळ्याचा कडकडाट व शंखनादाने समुचे शहर दुमदुमून गेले
एकीकडे कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाची भीती तर दुसरीकडे आस्था व श्रद्धा अशा प्रसंगात ही न खचता घरो घरी सोशियल डिसटिशन नियमचे पालन करून श्रीकृष्ण जन्माष्टामी साजरी करण्यात आली
तर शहरातील पुरातन मुरलीधर मंदिरात मंदिराचे विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत कु्ष्णजन्माचे आयोजन करण्यात आले होते
कोरोनाच्या संकटकाळात परिवारातील मंडळींनी एकत्रीत येऊण आपल्या नातवंडांत कु्ष्णरुपी बालरुप बघून स्वतःला आनंदीत तर केलेच तसेच त्यांच्या हस्ते घरातच दहीहंडी चे आयोजन ही अनेक ठिकाणी करण्यात आले