मौदा १२ ऑगस्ट :- । दोन वर्षांपूर्वी नव्याने रुंदीकरण झालेला मौदा टी पॉईंट ते केसलापूर हा चार की मी लांबीचा डांबरी रस्ता पूर्ण पणे खड्डेमय झाला आहे अनेक ठिकाणीं जीवघेणे खड्डे पडले असून या खड्यात पावसाचे पाण्याचे मोठ्या प्रमाणात संचयन होत असल्यामुळे मार्गावर अपघात होण्याची शेकयेता वाढली आहे मौदा शहरातून रामटेक आणि एन टी पी सी कडे जाणारा हा मार्ग अतिशय वर्दळीचा मार्ग असून विविध कंपनी मध्ये रात्रपळीवर जाणाऱ्या कामगारांना आपली दुचाकी चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो सदर मार्ग दुरुस्त करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजप नेते नरेश मोटघरे यांनी केला आहे सदर रस्ता त्वरित दुरुस्त करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागाने ठोस पाऊले उचलावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नरेश मोटघरे यांनी दिला आहे