कामठी श.१२ ऑगस्ट :- नागपूर जिल्यातील कामठी नगरपालिका जिल्यात सर्व्यांना मोठी नगरपालिका आहे तर गेल्या ७ जुलै ला मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची तडकाफडकी बदली नंतर आज पर्यंत नगरपालिका चे मुख्याधिकारी पद रिक्त होते तर या पदावर नव्याने यवतमाळ जिल्यातील वणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मिलनसार व्यक्तिमहत्व असलेले संदीप बोरकर कामठी शहरातील रखडले प्रश्न सोडतील अशी अपेक्षा कामठी चे नागरिक करत आहे, तर मुख्याधिकारी संदीप बोरकर कामठी नगरपालिका चे मुख्याधिकारीचे पदभार गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट ला स्वीकारतील अशी माहिती मिळाली आहे ।