देवलापार ता.प्र.११- स्थानिक पशुवैद्यकिय दवाखाण्यांतर्गत व पशु वैद्यकिय फिरते पथकाच्या वतीने नजिकच्या उसरीपार येथिल गुरांना विविध प्रकारचे लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मनोहरभाई पटेल क्रुषी महाविद्यालय हिराटोला(गोंदिया) ची विद्यार्थिनी धनश्री कैलास निघोट हिने केले होते. यावेळी फिरते पथकाचे पशुवैद्यकीय अधिकारी वसंता गोरे, परीचर गणेश खडके, क्रुषी सहाय्यक शोभा खानवटे, व विद्यार्थीनी धनश्री निघोट यांनी मार्गदर्शन केले.
क्रुषी महाविद्यालयाच्या अतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ग्रामिण क्रुषी कार्यानुभव व क्रुषी सोबत औद्योगीक जोडणी असा कार्यक्रम दिला जातो परंतू कोरोना मुळे हा कार्यक्रम त्या विद्यार्थ्यांना आपापल्या भागातील गाव निवडुन करायचा आहे. त्यामुळे धनश्रीने उसरीपार या आदिवासी व दुर्गम भागाची निवड करुन येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.
सदर क्षेत्र हे आदिवासी बहुल असुन या भागात गुरांवर अनेक रोग आक्रमण करतात. त्यामुळे त्याना रोग येवु नये यासाठी गुरांना प्रतिबंधीत लसीकरण करण्यात येेेते.याअंतर्गत उसरीपार येथील गुरांना एक टांग्या, घटसर्प, या सारख्या विविध प्रतिबंधीत लसी देण्यात आल्या तर हे रोग येवु नये यासाठी कोणती निगा राखावी व गुरांची काळजी कशी द्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गावातील शेतकरी अरुण कुमरे, बापुराज ईनवाते, चुन्नीलाल कुमेर व शेतकरी, पशुपालक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थीत होते.