युवा चेतना मंचतर्फे वर्धापन दिन साजरा

कामठी ता.युवा चेतना मंचाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन कामठी येथे करण्यात आले.* या प्रसंगी सकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व नंतर स्व .श्याम तांबोळी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.प्रस्तावीकेतुन अमोल नागपुरे यांनी युवा चेतना मंचचे माजी जिल्हा सनघटक स्व.श्याम तांबोळी यांच्या जीवनावर प्रकाश टाकले.तर प्रा.पराग सपाटे यांनी युवा चेतना मंच च्या इतिहास वर प्रकाश टाकले. सुत्रसंचालन अक्षय खोपे तर आभार प्रदर्शन बंटी पिल्ले यांनी केले. या प्रंसगी रनाळा येथील संत तुकाराम महाराज बालोद्यान आदर्श नगर व ओम त्रिमूर्ती नगर दुर्गा माता मंदिर परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी प्रा.पराग सपाटे,अक्षय खोपे,श्रीकांत अमृतकर, अमोल नागपुरे, गौतम पाटील, विजय आगरकर, अतुल चोरघडे, शिव कुशवाहा, बंटी पिल्ले ,मयुर गुरव, अतुल ठाकरे, उमेश गिरी, कमलाकर नवले, अमोल श्रावणकर, आशिष हिवरेकर आदींनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *