क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

अमरावती तिवसा ता प्र.:-आज ९ आगस्ट क्रांती दिन,तथा जागतिक आदिवासी दिन,आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची,आयुष्याची आहुती देणाऱ्या,घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी सर्वस्व अर्पण कारणाऱ्या थोर क्रांतिकारक, देशभक्त,शहीदांच्या स्मृतिस अभिवादन करण्यासाठी तसेच या स्वतंत्र लढ्यात तिवसा शहर आणि तिवसा तालुक्यातील ज्या देशभक्तांनी इंग्रज सरकारची शिक्षा भोगली,जेल,फाशी व अन्याय सहन केले अशा विर,क्रांतिकारक व शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी तिवसा पंचायत समिती येथील १५ आगस्ट १९७३ साली स्थापन केलेल्या शहीद स्मारकस्थळी तिवसा शहर काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र आले होते.
यासोबतच जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत विर बिरसा मुंडा याचे त्याग व बलिदानाचे,शौर्याचे स्मरण करून तथा प्रतिमेचे पूजन करून,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सुद्धा अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्वश्री तिवसा नगराध्यक्ष,जि नि स सदस्य वैभव स वानखडे,पं स ऊपसभापती शरद वानखडे,सरपंच मुकुंद पुनसे,नगरसेवक सचिन गोरे,शहर काँग्रेसचे अध्यक्ष अतुल वै देशमुख,बाजार समिती संचालक योगेश क वानखडे,शहर युवक काँग्रेसचे अद्यक्ष सागर राऊत,यु का महासचिव अंकुश देशमुख,उमेश राऊत,प्रशांत श्रीराव,प्रविण घाटोळ,गौरव ऊके, एन एस यु आय अध्यक्ष अनिकेत प्रधान,आशिष ताथोडे,प्रसाद लाजूरकर,सक्षम दापूरकर,यज्ञेष तिजारे,यश करडे,कुणाल अर्मळ, पंचायत समिती तिवसाचे कर्मचारी नागनाथ कदम,शशिकांत देशमुख,विठ्ठल पंडित,विस्तार अधिकारी घड्याळजी आदी मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *