तहसिलदार व्दारे बेकरी, बार व दारू दुकानाना २० हजाराचा दंड

बाजाराच्या दिवसी सुरू असले ल्या दुकानावर दंडात्मक कारवाई

कन्हान ता.प्र.दी.७: – कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हयातील गाव शहरात आठवडी बाजाराच्या दिव सी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असताना काही दुकाने सुरू असल्याने पारशिवनीचे तहसिलदार वरूणकुमार हयानी हयानी कन्हान शहरात शुक्रवार (दि.७) ला दुपारी सरप्राईज धाड मारून श्रीकृष्ण डेयरी ला ३००० रू, गौरव बार ५००० रू, तिरूमुला बार ३०००, हरिहर देशी दारू दुकान ३००० रू, जैस्वाल देशी दारू दुकान ३००० रू व स्टेशन रोड चा बार ३००० रूपयाचा दंड वसुल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मा वरूणकुमार सहारे तहसिलदार पारशिवनी, सुशांत नरहर नगरपरिषद कन्हान व कर्मचारी, येशु जोसेफ पो हवालदार गुन्हे पथक कन्हान पोलीस स्टेशन कन्हान सहकारी पोलीसांनी सक्रिय सहभाग घेतला.
या कार्यवाहीचे नागरिका व्दारे कौतुक करण्यात येत असुन रोज सायंकाळी ६ वाजता नंतर उशिरा रात्री पर्यंत कन्हान शहरात अवैद्य देशी, विदेशी दारू विक्री करणा-यावर सुध्दा कार्यवाही करून अवैद्य दारू विक्री सुघ्दा बंद करण्याची नागरिकात चर्चा जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *