नरसाळा येथील दोन घरी ५४ हजारा च्या दागिन्याची घरफोडी.

कन्हान ता.प्र.दी.७ : – पोलीस स्टेशन अंतर्गत नर साळा गावातील रमेश सराटकर व शेजा री दिनेश भोले यांच्या घराचे दाराचे कुलु प तोडुन घरातील लोखंडी आलमारीतुन अज्ञात चोरानी दोन घरातील सोने, चांदी चे दागिने किंमत ५४ हजाराचे दागिने घरफोडी करून चोरून नेले.
बुधवार (दि.५) च्या मध्यरात्री रमेश जयराम सराटकर रा. नरसाळा ता मौदा याच्या घराचे मागच्या दाराचे कुलुप, कों डा तोडुन घरातील लोंखडी आलमारीत ठेवलेली सोन्याची काळी पोत १२.६० ग्रॅ म, किंमत ३७५००रू, चांदीची पायपट्टी १० तोळे किंमत ३६००रू आणि शेजारी दिनेश भोले यांच्या घराच्या दाराचे कुलुप कोंडा तोडुन लोंखडी आलमारीतील सोन्याची नथ २ ग्रॅम किंमत ६००० रू, सोन्याचे ताईत १ ग्रॅम किंमत ३००० रू, चांदीचे जोडवे १२ तोळे किंमत ४०००रू असा एकुण दोन घराची घरफोडी अज्ञात चोरानी सोन्या, चांदीच्या दागिने किंमत ५४१०० रूपयाची चोरी करून पसार झाल्याने फिर्यादीच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसानी अज्ञात चोरा विरूध्द कलम ४५७, ३८० भादंवि नुसार गुन्हा नोंद करून थानेदार अरूण त्रिपाठी यां च्या मार्गदर्शनात पुढील तपास पोसनि सतिश मेश्राम करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *