नागपुर श.प्र.दी.४ :-अखंड हिंदू धर्माचे दैवत प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्या येथील राम मंदीर भूमिपूजन दि 5 ऑगस्टला होत आहे . खरं तर हा दिवस प्रत्येक हिंदूंसाठी एक स्वप्नपूर्ती दिवस आहे. इतक्या वर्षाची संघर्षपूर्ण मागणी पूर्ण होतेय. याचा आनंद प्रत्येकाच्या मनात दाटून आला आहे.अशा कोरोना च्या परिस्थितीत आपण प्रत्यक्ष भूमिपूजनासाठी सहभागी होऊ शकत नाही.यासाठी मी समस्त हिंदू बांधवांना 5 ऑगस्टला दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. जगातील प्रत्येक हिंदू बांधवांना अभिमान वाटावा असा हा दिवस आहे. उपनिषदांमध्ये एक प्रार्थना आहे “तमसो मा ज्योतिर्गमय” म्हणजेच अंधारातून मला प्रकाशाकडे ने. याच प्रमाणे तमाम भाविक दीपोत्सव द्वारे अंधारातून प्रकाशाकडे जातील.प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाशाला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे इतका आनंदाचा क्षण दिवा लावून साजरा व्हायलाच हवा. पंचमहाभूतां मधे तेजाचे प्रतीक म्हणजेच दिवा आहे. दिवा तीमीराला प्रकाशमान तर करतोच पण त्याच बरोबर आपल्या मनावर साठलेलं मळभ दूर करून प्रसन्नतेची उल्लासा ची ज्योत जागृत करतो.हिंदू धर्मात दिव्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक शुभकार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतात. प्रभू रामचंद्राचे रूप ही दिव्या प्रमाणे तेजोमय आहे . पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्यासह सुमारे 200 महंत व पाहुणे या कार्यक्रमाला हजेरी लावतील. कोरोना विषाणूचा संकटातही हा सोहळा भव्य व्हावा यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी स्वतः सोहळ्याचे नियोजन करत आहे.कोरोणामुळे आपण या राम मंदिर भूमिपूजन सोहळा ला प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही पण प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरी दीपोत्सव म्हणजेच किमान पाच दिवे लावून त्या उत्सवात सहभागी होऊ शकता.त्यामुळे मी पुन्हा समस्त हिंदू बांधवांना आव्हान करतो की आपण उद्याच्या दीपोत्सवात सहभागी व्हा. उद्याचा दिवस हा आपल्यासाठी आसमंत उजळून टाकणाऱ्या दिव्यांचा आहे. दिवा व तीची ज्योत एक सुंदर रूप आहे. काळोखाला भेदण्याचं सामर्थ्य एवढ्याशा दिव्यात आहे.आपल्या भोवतालच्या अंधाऱ्या विचारांना , परिस्थितीला भेदण्याचा काम एक दिवा करू शकतो.त्यासाठीच उद्याचा राम मंदिर भूमिपूजन दीपोत्सव महत्वाचा आहे.म्हणूनच उद्या सर्व मिळून दीपोत्सव साजरा करू.
चंद्रशेखर बावनकुळे
प्रदेश महामंत्री भाजपा