बीकेसीपीच्या सानिका मंगर ला राष्ट्रीय खेळासह १० वीत ९२ %

राष्ट्रीय खेळासह शिक्षणात कु सानिका मंगर ने बहुमान पटकाविला.
कन्हान ता.प्र.दी.२: – बीकेसीपी स्कुल कन्हान ची इयत्ता १० वी ची विद्यार्थीनी कु सानिका मंगर हिने धावनी मैदानी खेळात राष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्ण पदक प्राप्त करून ३%राष्ट्रीय खेडाळुचे गुण मिळवित शालां त परिक्षेत९२% गुणप्राप्त करित सर्वोत्तम विद्यार्थी खेडाळुचा बहुमान पटकाविल्या ने सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बीकेसीपी स्कुल कन्हान येथील कु सानिका मंगर ही इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असताना तालुका, जिल्हा, राज्य व अखिल भारतीय शालेय मैदानी धावणी(दौड) स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात १०० व २०० मध्ये प्रथम क्रमांक पटका वित राष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्ण पदक तर लांब उडीत रौप्य पदक प्राप्त केले. खेळा सोबत चांगला अभ्यास करित माध्यमिक शालांत (१०वी) च्या परिक्षेत ३% राष्ट्रीय खेडाळुचे गुण मिळवित ९२% गुण प्राप्त करित सर्वोत्तम विद्यार्थी खेडाळुचा बहु मान पटकाविला. तसेच शाळेतील विद्या र्थी खेडाळु राज्य स्तरिय खेळात विजय प्राप्त करित शालांत(१०वी)च्या परिक्षेत रोहीत यादव राज्य खेडाळुचे २ % गुण मिळवित ७४%,सौरभ चव्हाण २% गु़णा सह ७१ % आणि रूध्राक्ष मरघडे यांनी ८४% गुण प्राप्त करित खेळासह शालांत परिक्षेत किर्तीमान प्रथापित केल्याने कु सानिका मंगर, आई कुंदा, वडील अनिल मंगरसह सर्व प्राविण्य प्राप्त खेडाळु विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक राजीव खंडेलवाल, सचिव पुष्पा गेरोला मॅम, मुख्याध्यापिका कविता नाथ मॅम, विनय कुमार वैद्य सर, अमरजितकौर बुटानी मॅम, क्रिडा शिक्षक अमित ठाकुर व शिक्षिका सविता वानखेडे आणि सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी पुष्पगुच्छ, मिठाई ने सत्कार, अभि नंदन करून पुढील उज्वल भविष्या च्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *