धर्मराज विद्यालय कन्हान १० व १२ वी च्या गुणवंताचा सत्कार

कन्हान ता.प्र.दी.३१: – धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कान्द्री-कन्हान येथील १० व १२ वी चे पहिले तीन तीन आणि ८० % च्या वर गुण प्राप्त सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे विद्यालया व्दारे सत्कार करण्यात आला.
धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालय कान्द्री-कन्हान येथील १२ वी विज्ञान शाखेतुन प्रथम स्थान पटकावणा री खुशबु भोंडे (८४.४६%), वैशाली नेवारे (८४.३०%) व हर्षल पडोळे (७७. २३%) तसेच १० वी मध्ये प्रथम जानवी सेवकराम भोंडे (८९.८०%), श्रद्धा संजय घोडमारे (८९.४०%),सेजल सुरेश हिवसे (८८.८०%) मधुरा मनोज बोराडे(८८.%) आणि ८० % च्या वर गुण प्राप्त करणारे सर्व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्या त आला. शाळेचा १२ वी चा १००% निकाल व १० वी चा ९६.७३% निकाल लागला असुन प्रथम श्रेणीत ८५, द्वितीय श्रेणीत ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळे च्या उपमुख्याध्यापिका अनिता हाडके, प्रमुख अतिथि म्हणून पर्यवेक्षक रमेश साखरकर, जेष्ठ शिक्षक सुरेंद्र मेश्राम, सुनील लाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते . मान्यवारांच्या हस्ते सर्वांचे पुष्पगुच्छाने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल सारवे यांनी केले. यशस्वीते करिता हरीश केवटे , अनिल मंगर, हरिश्चंद्र इंगोले, विलास डाखोळे, राजुसिंग राठोड, अनिरुद्ध जोशी, मनीषा डुकरे, नरेंद्र कडवे, प्रकाश डुकरे, करिश्मा नडे हयानी सहकार्य केले. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी गुणवंता चे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *